अमरावती; पुढारी वृत्तसेवा : ऑनलाइन फसवणूक झालेल्या तक्रारकर्त्यांचे अकरा लाख रुपये परत केल्याची कामगिरी अमरावती पोलिसांनी केली. या रकमेसह हरविलेले २५४ मोबाईल देखील परत करण्यात आले आहेत. पोलीस आयुक्तालयाच्या मैदानावर महाराष्ट्र पोलीस दलाचा वर्धापन दिन सोहळा कार्यक्रम पार पडला. पोलीस आयुक्त एस. नवीनचंद्र रेड्डी यांच्या हस्ते ही रक्कम व मोबाईल परत करण्यात आले.
सायबर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या ऑनलाइन फसवणूक प्रकरणाचा तपास करण्यात आला. या प्रकरणातील ११ लाख रुपयाची रक्कम मूळ मालकांना परत करण्यात आली. ही यशस्वी कामगिरी केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर आयुक्तालयाच्या हद्दीत हरविलेल्या २५४ मोबाईलचा उच्च तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शोध घेण्यात आला. शोध घेण्यात आलेल्या मोबाईलची एकूण रक्कम अंदाजे ३० लाख ५२ हजार रुपये एवढी आहे. पोलीस वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या हस्ते हे मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले.
ही कामगिरी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त सागर पाटील, पोलीस उपयुक्त विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस स्टेशनच्या पोलिस निरीक्षक सीमा दाताळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र सहारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चैतन्य रोकडे, संजय धंदर, जगदीश पाली, विद्या राऊत, शैलेंद्र कर्डक, गजानन पवार, सुधीर चर्जन, ताहेर अली, पंकज गाडे, प्रशांत मोहोड, संग्राम भोजने, सचिन भोयर, उल्हास टवलारे, गोपाल सोळंके, मयूर बोरेकर, सुषमा गायकवाड, गजानन डूबे यांच्याकडून करण्यात आली.
हेही वाचा