Maharashtra NCP Crisis: आधीच कमकुवत राष्ट्रवादीला विदर्भात बंडाचा मोठा फटका !

Maharashtra NCP Crisis: आधीच कमकुवत राष्ट्रवादीला विदर्भात बंडाचा मोठा फटका !
Published on
Updated on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा :  नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नेतृत्वातील गटाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडाचा झेंडा फडकावला. या बंडात तूर्तास उघडपणे विदर्भातील चार आमदार व पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल अजित पवार यांच्यासोबत आहेत. एकतर कधीकाळी बऱ्यापैकी शक्ती असलेल्या या पक्षाची विदर्भात आता फारशी संघटनात्मक शक्ती नसली तरी या बंडाने राष्ट्रवादी कॉंग्रेसला विदर्भात अधिकच कमकुवत (Maharashtra NCP Crisis) केले आहे.

नेमके कुठे जायचे, आपल्या भविष्याचे काय? यादृष्टीने विदर्भातील पदाधिकाऱ्यांशी 'पुढारी' ने संपर्क साधला असता अनेक जण संभ्रमात असून मौन बाळगून आहेत. यापूर्वी म्हटल्याप्रमाणे गडचिरोली आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीने यानिमित्ताने दावा उघड केला आहे. गडचिरोलीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी अजित पवार यांची साथ देत मंत्रिपदाची शपथ घेतली. अजित पवार समर्थक आमदारांची जी यादी दिली, यात यवतमाळ जिल्ह्यातील पुसदचे इंद्रनील नाईकांचेही नाव आहे. खरेतर विदर्भाचा विचार करता आत्राम- नाईक ही दोन्ही घराणे शरद पवार यांचे निष्ठावान मानले जातात. भविष्याचा वेध हे त्यामागचे महत्वाचे कारण मानले जाते. अकोल्याचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी उघडपणे अजित पवार यांच्यासोबत  आहेत. पूर्व विदर्भातील भंडाऱ्याचे आमदार राजू कारेमोरे हे प्रफुल्ल पटेल यांचे निष्ठावान असल्याने ते तिकडेच जाणार हे उघड (Maharashtra NCP Crisis) आहे.

नागपूर जिल्ह्यात माजी मंत्री अनिल देशमुख व रमेश बंग हे पक्षाचे प्रमुख नेते आहेत आणि दोघेही शरद पवार यांचे निष्ठावान म्हणूनच ओळखले जातात. आज तरी ते पवारांसोबतच आहेत. काल देशमुख अजित पवार यांच्या बैठकीत होते, समर्थकांनी अभिनंदन देखील केले पण आज या सर्वांनी आम्ही पवार साहेबांसोबत असल्याचा घुमजाव केला.

देशमुख समर्थक जिल्हाध्यक्ष बाबा गुजर पवार यांच्यासोबत असल्याचे उघड असताना शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, आभा पांडे हे पूर्व विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे दावेदार ' नॉट रिचेबल' आहेत. प्रफुल पटेल व अजित पवार  यांच्याशी त्यांची सलगी कायम राहते की ते पवार यांच्यासोबत जातात हे बैठकीत उघड होणार आहे. अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके हे कायम अजित पवार यांच्यासोबत आहेत. दरम्यान, गोंदिया जिल्ह्यातील आमदार मनोहर चंद्रिकापुरे हेही अजित पवारांसोबत आहेत.

चंद्रपूर जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांचे मोबाईल नॅाट रिचेबल आहेत. आमदार अमोल मिटकरी आणि अकोला महानगराध्यक्ष विजय देशमुख हे दोघेही शपथविधीला उपस्थित होते. दुसरीकडे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्यासह सर्व वरिष्ठ नेते 'वेट अँड वॉच' भूमिकेत आहेत. ही मोठी राजकीय उलथापालथ होत असताना बुलढाणाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे सध्या बाहेर आहेत. एकंदरीत मुंबईतील शक्तिप्रदर्शन कोण कुणाकडे ? हे स्पष्ट करणार आहे.

          हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news