चंद्रपूर : नागभीड तालुक्यात थंडीने गारठून शेतकऱ्याचा मृत्यू | पुढारी

चंद्रपूर : नागभीड तालुक्यात थंडीने गारठून शेतकऱ्याचा मृत्यू

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा

रात्रभर अंगणात झोपून राहिल्याने थंडीने गारठून एका (55 वर्षीय) शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज (शुक्रवार) नागभीड तालुक्यातील चिंधीमाल येथे सकाळच्या सुमारास उघडकीस आली. देवराव महादेव अलाम असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. सदर शेतकऱ्याचा मृत्यू थंडीने गारठून झाल्याचे सांगितले जात आहे.

नागभीड तालुक्यातील चिंधीचक गट ग्रामपंचायती अंतर्गत चिंधीमाल येथील देवराव महादेव अलाम हे रहिवासी होते. काल (गुरुवार) ते रात्री अंगणातच झोपून राहिले. सध्या कडाक्याची थंडी असल्याने ते रात्रभर थंडीने गारठले. यातच त्यांचा दुर्देवाने मृत्यू झाला.

आज सकाळच्या सुमारास पत्नीने त्‍यांना उठून बघितले असता, अंगणात पती मृत्तावस्थेत आढळून आले. ते थंडीने गारठलेल्या अवस्थेत होते. मुले बाहेर असल्याने पती-पत्नी दोघेच घरी होते. थंडीने गारठलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने त्यांचा मृत्यू हा थंडीने झाला असावा असा संशय व्यक्त केल्या जात आहे. आज दुपारच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना असा परिवार आहे.

Back to top button