

नागपूर : पुढारी वृत्तसेवा
विदर्भातील काही जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भ हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला. काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला. तर काही ठिकाणी गारपिटीनेही तडाखा दिला. यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालं. आता पंचनामे होणार काय, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.
नागपूर, गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली. ढगाळ वातावरण तसेच पावसामुळं हवेत गारठा निर्माण झाला. यामुळं पिकांचं नुकसान होत आहे. नरखेड तालुक्यात अवकाळी पावसानं नुकसान झालंय. यापूर्वी पावसानं खरीपाचं नुकसान केलं. आता अवकाळी पावसानं व गारपिटीनं शेतातील पिकांचं नुकसान झालंय. जलालखेडा परिसरात काही शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा पिकांचं नुकसान झालंय. तुरीलाही या पावसाचा फटका बसला. गहू हे पीक जोमात होतं.
अशात गारपिटीमुळं संत्राही गळून पडला. भाजीपाला पिकाचंही या पावसात नुकसान झालं. पावसामुळं गारठ्यात वाढ झाली आहे. आंबा बहारावरही या वातावरणाचा फटका बसणार आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
नागपूरच्या नरखेड तालुक्यात गारपीट झाली आहे. वाढोना आणि मेंढला परिसरात गारांचा पाऊस, इतर पिकांसह संत्र्याचे नुकसान. हवामान विभागाकडून विदर्भासाठी दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
हेही वाचा :