नागपूर : विद्यार्थ्याला कोरोना झाल्याने एक आठवडा शाळा केली बंद | पुढारी

नागपूर : विद्यार्थ्याला कोरोना झाल्याने एक आठवडा शाळा केली बंद

नागपूर, पुढारी वृत्तसेवा

जवळपास दोन वर्षांपासून बंद असणाऱ्या शाळा काही दिवसांपासून सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र नागपुरातील एका शाळेत शिकत असणाऱ्या एक विद्यार्थ्याचा कोरोना अहवाल पॉझीटिव्ह आल्याने, ती शाळा आठवडाभर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे पालकांत खळबळ उडाली आहे.

सदर शाळेतील हा विद्यार्थी गेल्या दोन दिवसांपासून आजारी होता. त्यामुळे त्याची आज ‘आरटीपीसीआर’ चाचणी करण्यात आली. त्यामध्ये त्याचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याचे स्पष्ट झाले. त्याला उपचारासाठी गृहविलगणीकरणात ठेवण्यात आले असून, संपूर्ण शाळेचं निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तसेच शाळाही एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

राज्य सरकारने दिलेल्या निर्णयानुसार १५ जुलैला ग्रामीण भागातील ८ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. तर २० ऑक्टोबरपासून ५ वी ते ८ वी व शहरी भागातील ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरू झाल्या होत्या. शाळा सुरू झाल्यावर कोरोना नियमांचे पालन करत ५० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती ठेवण्यास मंजुरी देण्यात आली होती.

हेही वाचा

Back to top button