Brightcom : अरे बापरे; ‘या’ शेअर्समुळे १ लाखाचे झाले ४० लाख… तेही एका वर्षात!

Brightcom : अरे बापरे; ‘या’ शेअर्समुळे १ लाखाचे झाले ४० लाख… तेही एका वर्षात!
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : समजा तुम्ही अगदी वर्षभरापूर्वी LYCOS INTERNET LIMITED (Brightcom) या शेअरमध्ये १ लाख रूपयांची जरी गुंतवणूक केली असती तर तुम्हाला आजच्या घडीला जवळपास ४५२५ % परतावा म्हणजेच ४० लाख ४० हजार रूपये मिळाले असते. सध्या NSE व BSE वर Brightcom नावाने हा शेअर्स ओळखला जात असून, आज एका शेअर्सची किंमत १९६ रूपये आहे.

२१ डिसेंबर २०२० रोजी या शेअर्सची किंमत फक्त 5 रूपयांच्या आसपास होती. तर १३ डिसेंबर रोजी हा शेअर्स ६ रूपयांवरून २०२ रूपयांवर पोहचला होता.

शेअर बाजारात सध्या LYCOS INTERNET LIMITED (Brightcom) या शेअर्सचा चांगलाच बोलबाला आहे. कारण ज्या गुंतवणुकदारांनी या कंपनीचे शेअर्स गेल्या वर्षी खरेदी केले होते. ते आज अक्षरशः मालामाल झाले आहेत. एक वर्षात त्यांना तब्बल ४५२५ टक्के रिटर्न्स मिळाले आहेत.

हैद्राबादमधील ब्राइटकॉम ग्रुपचा हा शेअर्स असून, या ग्रुपची स्थापना सन 2000 मध्ये झालेली आहे. मुख्यतः डिजिटल मार्केटिंग करणे हे या कंपनीचं काम आहे. भारतासह यूएस, अर्जेंटिना, ब्राझील, चिली, उरुग्वे, मेक्सिको, यूके, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन, युक्रेन, सर्बिया, इस्रायल, चीन या देशातही या कंपनीची कार्यालये आहेत.

समजा एक वर्षापुर्वी तुम्ही LYCOS INTERNET LIMITED (Brightcom) या कंपनीचे १ लाख रूपयांचे २० हजार शेअर्स खरेदी केले असते तर आज गुंतवणूक केलेल्या १ लाख रूपयांचे जवळपास ४० लाख ४० हजार रूपये इतकी मोठी रक्कम तुम्हाला मिळाली असती.

सध्याच्या डिजिटल युगात प्रत्येक कंपन्या डिजिटल मार्केटींगचा फंडा मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे. कोरोना काळात तर या कंपनीची चांदीच झाली आहे. त्याचाच फायदा LYCOS INTERNET LIMITED (Brightcom) या कंपनीला झाला. या कंपनीची सन २०२० मधील कमाई जवळपास ४४० कोटींच्या घरात आहे. तर कंपनीची एकूण मालमत्ता २८७५ कोटी रूपयांची झाली आहे. एकंदरीतच या कंपनीची घौडदौड पाहता Brightcom कंपनीचे शेअर्स भविष्यातही चांगला परतावा देवू शकतील असा अंदाज तज्ञांनी वर्तवला आहे.

यंदाच्या वर्षात शेअर बाजारात अनेक कंपन्यांच्या शेअर्सनी गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. यावेळी सर्वाधिक कमाई करून देणाऱ्या शेअर्समध्ये अनेक मिडकॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांचा समावेश आहे.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news