अकोला; पुढारी वृत्तसेवा : व-हाडातील अकोला, वाशिम, बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज 10 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यात 287, वाशिम जिल्ह्यात 168 तर बुलडाणा जिल्ह्यात 367 असे 821 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
महाविकास आघाडीचे गोपीकिसन बाजोरिया व भारतीय जनता पार्टीचे वसंत खंडेलवाल यांच्यात ही थेट लढत होत आहे. तिन्ही जिल्ह्यात 22 मतदान केंद्रावर मतदान होईल. सकाळी 8 वाजेपासून दुपारी 4 वाजे पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदारांमध्ये 389 पुरुष तर 432 महिला मतदारांचा समावेश असेल. 14 डिसेंबरला मतमोजणी प्रक्रिया पार पडून निकाल लागेल. तिन्ही जिल्ह्यात 22 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.
अकोला शहरात बी.आर. हायस्कूल, अकोट तहसील कार्यालय, तेल्हारा तहसील कार्यालय, बाळापूर पंचायत समिती, पातूर न. प. कार्यालय, मूर्तिजापूर तहसील कार्यालय, बार्शिटाकळी पंचायत समिती कार्यालय, वाशिम जिल्ह्यात वाशिम तहसील कार्यालय, कारंजा तहसील कार्यालय, मंगरुळपीर तहसील कार्यालय, रिसोड तहसील कार्यालय, बुलडाणा जिल्ह्यात बुलडाणा तहसील कार्यालय, तहसील कार्यालय चिखली, तहसील कार्यालय देऊळगांव राजा, तहसील कार्यालय सिंदखेड राजा, तहसील कार्यालय लोणार, पंचायत समिती मेहकर, तहसील कार्यालय खामगाव, तहसील कार्यालय शेगाव, तहसील कार्यालय जळगाव जामोद, पंचायत समिती कार्यालय नांदुरा आणि मलकापूर तहसील कार्यालयात मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत.