मुंबई : पुढारी वृत्तसेवा
मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेल्या 5 व्या नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग चाचणीत, मुंबईतील २२१ रुग्णांमधील कोविड विषाणू नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये 'डेल्टा व्हेरिअंट' चे ११ टक्के तर 'डेल्टा डेरिव्हेटीव्ह' चे ८९ टक्के रुग्ण आढळले आहेत. तर ओमायक्रॉन या नवीन प्रकाराचे फक्त २ रुग्ण (संकलित नमुन्यांच्या संख्येत १ टक्क्यांपेक्षाही कमी) आढळले आहेत.
यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे तपासलेल्या नमुन्यांमध्ये एकाही बाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.
हेही वाचा