गोंदिया: मोहाडी ते गिधाडी रस्त्यावर बेपत्ता वृद्धाचा मृतदेह आढळला

मृतदेह
मृतदेह
गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : गोरेगाव तालुक्यातील मोहाडी ते गिधाडी रस्त्यावर नवनिर्मित पुलाच्या  काही अंतरावर  रस्त्याच्या बाजूला एका बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. ही घटना आज (दि. २७) सकाळी ९ च्या सुमारास उघडकीस आली. धोंडु मुका चाचेरे (वय ६५ वर्षे रा. मोहाडी) असे मृताचे नाव आहे. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी याच परिसरात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. त्यात आज पुन्हा एक मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
तालुक्यातील गिधाडी-मोहाडी मार्गावर दोन दिवसांपूर्वी नवनिर्मित पुलाजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह दिसून आला होता, दरम्यान सदर मृत भास्कर पटले ( रा. पिपरटोला (निंबा) असल्याचे व त्याचा अपघाती मृत्यू झाल्याचे उघड झाले होते. त्यातच आता आज सकाळी मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहाडी येथील ६५ वर्षीय धोंडू मुका चाचेरे हे घरातून  (दि. २१ मे) बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी रविवारी (दि.२६) गोरेगाव पोलीसांत केली होती. विशेष म्हणजे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने घटनास्थळावरच उत्तरीय तपासणी करण्यात आली. घटनेची नोंद गोरेगाव पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news