गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : मालवाहू ट्रक चालकाने आपले वाहन भरधाव वेगात चालवून एसटी बस, ट्रक व त्यानंतर पोलीस वाहनाला जबर धडक दिल्याची घटना काल (दि. २२मे) सकाळी ११. १५ वाजताच्या सुमारास शहरातील रिंगरोड परिसरात घडली. या विचित्र अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला. तर स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक व पोलीस कर्मचाऱ्यांसह चारजण गंभीर जखमी झाले.