Nitin Gadkari : नितीन गडकरींनी शपथपत्रात खोटी माहिती दिली?, नाना पटोले न्यायालयात | पुढारी

Nitin Gadkari : नितीन गडकरींनी शपथपत्रात खोटी माहिती दिली?, नाना पटोले न्यायालयात

नागपूर; पुढारी वृत्तसेवा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत खोटे शपथपत्र दाखल करून यश मिळविल्याचा आरोप करणारा अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयापुढे दाखल करण्यात आला आहे. न्यायाधीश एस सैयद यांनी, या प्रकरणी गडकरींना नोटीस बजावली आहे. नाना पटोले यांनी अॅड. सतीष उके यांच्यामार्फत हा अर्ज दाखल केला आहे. या शपथपत्रात गडकरींनी आपली संपत्ती, उत्पन्न तसेच वैयक्तिक माहिती चुकीची दिल्याने मतदारांची दिशाभूल झाल्याचा दावा केला आहे.

याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेली याचिका प्रलंबित आहे. पटालेंनी उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर गडकरींनी पटोलेंनी दाखल केलेले शपथपत्र बेकायदेशीर असल्याचा प्रतिदावा केला होता. पटोलेंनी केलेले आरोप ऐकीव माहितीच्या आधारे करण्यात आले आहे. याबाबतीत त्यांच्याकडे सबळ पुरावे नाहीत, असा युक्तिवाद गडकरींतर्फे करण्यात आला होता. (Nitin Gadkari)

या प्रकरणी उच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून या प्रकरणावरील निकाल राखून ठेवला आहे. पुढील सुनावणीवेळी याचा निकाल लागण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयातील याचिका ही दिवाणी स्वरुपाची असून, आता पटोलेंचे वकील उके यांनी, हेच आरोप करीत सत्र न्यायालयापुढे फौजदारी स्वरुपाची याचिका दाखल करून, त्यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी केली आहे.

हेही वाचा

Back to top button