अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांची IMFच्या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती | पुढारी

अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांची IMFच्या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती

गीता गोपीनाथ यांच्याकडे फर्स्ट डेप्युटी डायरेक्टर ची जबाबदारी

नवी दिल्ली : मूळ भारतीय असलेल्या अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांना बढती मिळाली आहे. त्यांची नियुक्ती आतंरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) फर्स्ट डेप्युटी डायरेक्टर पदावर नियुक्ती झालेली आहे. सध्या त्या IMFच्या मुख्य अर्थतज्ज्ञ आहेत.

IMFच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्तालिना जॉर्जिएव्हा यांनी ही घोषणा केली आहे. कोरोना काळात गोपीनाथ यांनी महत्त्वपूर्ण काम केल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

“त्यांच्या नेतृत्त्वाचा आणि बुद्धिमत्तेचा जगाला तसेच नाणेनिधीलाही मोठा फायदा झालेला आहे. सध्याचा काळ अर्थव्यवस्थेसाठी सर्वांत कठीण काळ आहे, हे लक्षात घेता गोपीनाथ यांच्या कामाचं महत्त्व लक्षात येतं.”

गेली तीन वर्षं गोपीनाथ IMFवर मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

गोपीनाथ यांच्या कार्याची दखल जगभरात घेतली जाते. नाणेनिधीच्या संशोधनात्मक कार्याचा त्यांनी मोठा विस्तार केलेला आहे. जगातील सर्व नागरिकांना परवडेल अशा दरात लस उपलब्ध करून कोरोनाचे संकट दूर करता यावं यासाठी त्या कार्यरत आहेत. गोपीनाथ यांच्याकडे संशोधन आणि नाणेनिधीच्या विविध प्रकाशनांची जबाबदारी असेल.

हे वाचलं का?

Back to top button