Vidarbha Accident: गोंदिया: गोरेगाव येथे ट्रक-दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू : एक गंभीर  | पुढारी

Vidarbha Accident: गोंदिया: गोरेगाव येथे ट्रक-दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू : एक गंभीर 

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा: गोरेगाव येथील पोलीस ठाण्यासमोर राष्ट्रीय राज्य महामार्गावर शनिवारी (ता ०४) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास उभ्या ट्रकवर दुचाकी आदळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. गणेश शामलाल सिंधीमेश्राम (वय २४ रा. मुंडीपार) असे मृताचे तर उज्ज्वल यशवंत गायधने (वय २१ रा. मुंडीपार) असे गंभीर जखमीचे नाव आहे. (Vidarbha Accident)
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस स्टेशन समोरील राष्ट्रीय राज्य महामार्गावर ट्रकच्या (क्रमांक एमएच ३५ ए.जे. १२२५) चालकाने आपले वाहन निष्काळजीपणे सार्वजनिक महामार्गावर वाहनांना अडथळा निर्माण होईल या प्रकारे उभे केले होते. दरम्यान, रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास मुंडीपार येथील दोन युवक गोरेगाववरुन स्वगावी दुचाकीने (क्रमांक एमएच ३५ ए पी १८६८) जात असताना उभे ट्रक दिसून न आल्याने ट्रकच्या मागील भागास दुचाकीची धडक बसली. ज्यामध्ये दुचाकी चालक गणेश सिंधीमेश्राम याचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेला उज्ज्वल गायधने गंभीर जखमी झाला. (Vidarbha Accident)
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. गंभीर जखमीला उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात आले. तर उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह गोंदिया येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. या प्रकरणी फिर्यादी रामलाल सिंधीमेश्राम (वय ४२ रा. मुंडीपार) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी कलम २८३,३०४,’अ’ ३३७,३३८ भादवी अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अजय भुसारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार यशवंत शहारे करीत आहेत. (Vidarbha Accident)

Back to top button