Gondia BJP : काँग्रेस, राष्ट्रवादी, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Gondia BJP : काँग्रेस, राष्ट्रवादी, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेना शिंदे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते व माजीमंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थित भाजपमध्ये प्रवेश केला. अर्जुनी-मोरगाव येथील एस. एस. जे. महाविद्यालयाच्या प्रांगणात माजी मंत्री राजकुमार बडोले आयोजीत नमो चषक 2024 क्रिडा व सांस्कृतिक महोत्सव तथा पारितोषिक वितरण सोहळा रविवारी पार पडला. यावेळी हा पक्षप्रवेश झाला. Gondia BJP

माजी मंत्री राजकुमार बडोले यांच्या कार्यकर्तृत्वार विश्वास ठेवून तालुक्यातील अरततोंडी येथील रहिवासी व झाडीपट्टीतील प्रख्यात नाट्यलेखक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय ठवरे, शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते अश्विनसिंग गौतम, मिना शहारे यांचे नेतृत्वात तावसी, निलज येथील अनेक महिला कार्यकर्ते तथा केशोरी परिसरातील प्रकाश गहाणे यांचे नेतृत्वात विधानसभा क्षेत्रातील अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. Gondia BJP

सर्व प्रवेशकर्त्यांचे माजी मंत्री राजकुमार बडोले, भाजपा प्रदेश कार्यकारिणी उपाध्यक्ष संजय भेंडे, खासदार सुनिल मेंढे, अॅड. येशुपाल उपराडे, माजी आमदार हेमंत पटले, संपर्क प्रमुख विरेंद्र अंजनकर, महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम शिवाली परब, ज्येष्ठ नेते नामदेव कापगते, शिवनारायण पालीवाल, उमाकांत ढेंगे, तालुका भाजपा अध्यक्ष विजय कापगते, रचना गहाणे, प्रकाश गहाणे, जि.प.सदस्य लायकराम भेंडारकर, सडक-अर्जुनी तालुका अध्यक्ष लक्ष्मीकांत धानगाये, सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, व अन्य कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेणा-यांचा पक्षाचा दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

या पक्षप्रवेशामुळे अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रात भाजपची ताकत वाढली आहे. माजी मंत्री राजकुमार बडोले यांचे हात मजबूत झाले आहेत.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news