राष्ट्रवादीला धक्का! गोदिंयाच्या नगराध्यक्षांसह १५ नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

eknath shinde
eknath shinde

राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार पुत्राच्या नेतृत्वात गोंदिया जिल्ह्यातील २ नगराध्यक्ष सह १५ नगरसेवक शिवसेना (शिंदे) गटात पक्ष प्रवेश
गोंदिया : पुढारी वृत्तसेवा – गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज मोठे खिंडार पडले आहे. अर्जुनी मोरगाव विधानसभाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोहर चांद्रिकपुरे यांचे सुपुत्र सुगत मनोहर चांद्रिकापुरे यांच्या नेतृत्वात गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी व अर्जुनी मोरगाव नगर पंचायतचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही नगराध्यक्षांसह १५ नगरसेवकांनी आज २६ मे रोजी शिंदे गटात प्रवेश केला. सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे निवासस्थानी शिवसेना (शिंदे) गटात पक्ष प्रवेश केला. या प्रसंगी शिवसेना गोंदिया जिल्हा प्रमुख (शिंदे) सुरेंद्र नायडू उपस्थित होते.

आज झालेल्या या प्रवेशामुळे गोंदिया भंडारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते खा. प्रफुल पटेल आणि माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्यामध्ये सडक अर्जुनी नगर पंचायतचे नगराध्यक्ष तेजराम मडावी, उपाध्यक्ष वंदना किशोर डोंरगरवार, बांधकाम सभापती अंकित टिकाराम भेंडारकर, माजी बांधकाम सभापती महेंद्र जयपाल वंजारी, पाणीपुरवठा सभापती साईस्ता मतीन शेख, महिला बाल कल्याण सभापती दीक्षा राजकुमार भगत, माजी नगरअध्यक्ष देवचंद तरोने, माजी नगर अध्यक्ष शशीकला टेंभुर्णे, नगर सेवक गोपीचंद धोंडू खेडकर, नगरसेवक अशलेस मनोहर अंबादे, नगरसेवक तायमा जुबेर शेख, नगरसेवक कामिनी कोवे, दिलीप गभने माजी नगसेवक, धानवंत कोवे, विदेश टेंभुर्ने, मतीन शेख अशा सडक अर्जुनीच्या 16 लोकांनी पक्ष प्रवेश केला आहे.

तर अर्जुनी मोरगाव नगर पंचायतचे नगर अध्यक्षा मंजुषा बारसागडे आणि बांधकाम सभापती सागर आरेकर व नगरसेवक दीक्षा शहारे आणि इतर दोन अशा एकूण 5 राष्ट्रवादी काँग्रेस च्या नगर सेवकांनी देखील आज पक्ष प्रवेश केले आहे.

एकंदरीत २१ प्रमुख जणांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटात आज प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे या शिवसेना पक्षप्रवेश मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे सुपुत्र डॉक्टर सुगत मनोहर चंद्रिकापुरे यांचा नेतृत्वात हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रवेश केलेल्या सर्वांना आपल्या पक्षाचे उपरणे घालून त्यांचा प्रवेश केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news