Nagzira Sanctuary: नागझिऱ्यात टी-४ वाघिणीचा दबदबा; २ छाव्यांसह दिले दर्शन | पुढारी

Nagzira Sanctuary: नागझिऱ्यात टी-४ वाघिणीचा दबदबा; २ छाव्यांसह दिले दर्शन

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : नवेगाव -नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध असलेल्या टी-4 या वाघिणीने तिच्या दोन छाव्यांसह दर्शन दिले. त्यामुळे आगामी काळात व्याघ्र प्रकल्पात व्याघ्रप्रेमींची वाढ होण्याची शक्यता बळावली आहे. Nagzira Sanctuary

गेल्या वर्षभरपूर्वी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांना सोडण्यात आल्यानंतर नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यापैकी एक वाघ गोंदिया शहरानजीकच्या पांगडी जलाशय परिसरात दिसून आले होते. त्यातच 1ऑक्टोबरपासून पर्यटनाला हिरवी झेंडी दिल्यानंतर पर्यटकांचा कल नागझिरा व्याघ्र प्रकल्पाकडे वाढू लागला आहे. Nagzira Sanctuary

दरम्यान, या व्याघ्र प्रकल्पातील प्रसिद्ध असलेल्या टी-4 या वाघिणीने तिच्या दोन छाव्यांसह पर्यटकांना दर्शन दिले असून जंगल सफरीला आलेल्या काही पर्यटकांनी त्यांचा व्हिडिओ आणि फोटो समाज माध्यमावर प्रसिद्ध केले असता ते प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे आगामी काळात नवेगाव -नागझिरा व्याघ्र प्रकल्पात व्याघ्रप्रेमींची वाढ होण्याची शक्यता बळावली आहे. विशेष म्हणजे, गोंदिया जिल्ह्यात नवेगाव-नागझिरा हा एकमेव व्याघ्रप्रकल्प आहे.

गेल्या काही वर्षात भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचे व्याघ्र वैभव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवेगाव – नागझिरा व्याघ्र प्रकल्पात आता पर्यटकांचा ओघ वाढला आहे. मागील वर्षी याच व्याघ्र प्रकल्पात राज्याचे पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत, चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांना या व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आले होते. सध्या या व्याघ्र प्रकल्पातील विविध गेटवरून येणाऱ्या पर्यटकांना वाघाचे सहज दर्शन होत असल्याने पर्यटकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.

हेही वाचा 

Back to top button