Weather Forecast: पुढील दोन दिवस राज्यातील 'या' भागात अवकाळीची शक्यता | पुढारी

Weather Forecast: पुढील दोन दिवस राज्यातील 'या' भागात अवकाळीची शक्यता

पुढारी ऑनलाईन डेस्क:  Rainfall राज्यातील काही भागात पुढील दोन दिवस अवकाळीची शक्यता आहे. राज्यातील विदर्भ आणि मराठवाडा भागातील काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. या संदर्भातील माहिती पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख हवामानशास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी एक्स अकाऊंटवरून दिली आहे.  (Weather Forecast)

विदर्भात ऑरेंज अलर्ट, नागपुरात पावसाची शक्यता

महाराष्ट्राच्या विदर्भात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विदर्भातील नागपूर, भंडारा-गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट अपेक्षित आहे, अशी भारतीय हवामान विभागाने दिली आहे. (Weather Forecast)

हेही वाचा:

Back to top button