Nitesh Rane On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे खोटारडा माणूस : नितेश राणे | पुढारी

Nitesh Rane On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे खोटारडा माणूस : नितेश राणे

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: उद्धव ठाकरेंपेक्षा मोठा खोटारडा माणूस या महाराष्ट्रात नाही. अमित शहा यांनी दिलेला शब्द पाळण्याची विश्वासार्हता फार मोठी आहे. संजय राऊत असा दावा करत असेल, तर हा तिथे होता का? उगाच नाक रगडत शेंबड्या मुलांसारखं बोलण्याला काहीच अर्थ नाही. संजय राऊतच्या शब्दाला महाराष्ट्र सोडा, त्याच्या घरात तरी मान आहे का ? असा सवाल आमदार नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला.Nitesh Rane On Uddhav Thackeray

आज अकोलामध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा आहे. अकोल्यामध्ये टिपू सुलतान उदात्तीकरण आणि छत्रपती शिवराय यांचा पुतळा बसवण्यासाठी विरोध या सगळ्या विरुद्ध हिंदू समाजाच्या मनात अस्वस्थता आहे. या हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी, ताकद देण्यासाठी आज सगळे हिंदुत्ववादी संघटना मिळून मोर्चा काढत आहे, त्यात सहभागी होण्यासाठी मी आलो आहे, असे त्यांनी सांगितले.
मुस्लीम आरक्षण संदर्भात बोलताना मुस्लिम समाजाला किंवा कुठल्याही धर्माच्या आधारे आरक्षण मिळू शकत नाही, हे कोर्टाने स्पष्ट केले आहे. मुस्लिम समाजातील असंख्य जाती आहेत, त्या जातीचा अभ्यास करून जर आरक्षण मागितले, तर ते शक्य आहे. चुकीच्या पद्धतीच्या मागण्या करू नका, चुकीच्या मागण्यांची दखल आमचे सरकार घेणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा ही भूमिका सभागृहात मांडली आहे.Nitesh Rane On Uddhav Thackeray

एक हिंदू जर दुसऱ्या हिंदूला संपवायला जात असेल. तर हिंदू समाज म्हणून हे फार मोठे नुकसान आहे. मी जरांगे पाटलांना सांगेल की, हिंदू आपसात लढतील तर त्याचा फायदा जिहाद्यांना होईल. आज पूर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोबत आहे. काँग्रेस मधील नेत्यांनाही आता समजलेय की, राहुल गांधींच्या मोहब्बत की दुकानचा माल संपलेला आहे. ते नफ्याचे दुकान राहिलेले नाही. त्यामुळे न्याय यात्रेत लोकं आता शिल्लक राहिलेली नाहीत. काँग्रेसच्या नेत्यांना आपले भविष्य मोदींच्या गॅरंटीमध्ये दिसत आहे.

झारखंडमधील जातीय जनगणना याकडे लक्ष वेधले असता बिहारचा निर्णय आहे. त्याचा अभ्यास करून त्यावर प्रतिक्रिया देता येईल. काँग्रेस हा हिंदूद्वेषी पक्ष आहे. त्यांचा इतिहास तसाच राहिलेला आहे, असा आरोप करीत आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याशी सहमत आहोत, असेही राणे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा 

Back to top button