नागपूर : दारूच्या नशेत चाकूने हल्ला, दोघेजण जखमी | पुढारी

नागपूर : दारूच्या नशेत चाकूने हल्ला, दोघेजण जखमी

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : दारूच्या नशेत असलेल्या आरोपीने तासाभरात दोन ठिकाणी चाकूने हल्ला करुन दोघांना गंभीर जखमी केल्याची घटना अंबाझरी पोलीस स्टेशन अंतर्गत घडली आहे. आरोपीने अगोदर लक्ष्मी नगर चौकातील बटुक भाई ज्वेलर्सजवळ एका छोट्या व्यावसायिक वृध्द व्यक्तीवर चाकूने हल्ला केला व अर्ध्या तासाने लक्ष्मी नगर परिसरात असलेल्या बारमध्ये सुरक्षारक्षकाने शस्त्रासह हॉटेलमध्ये जाण्यास मनाई केल्याने त्यांच्यावरही चाकूने हल्ला करून त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. यामधील आरोपी हर्षल सेलूकर, निखिल निखारे, गुलाम मुस्तफा खान, यांच्यावर पोलीसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. यामधील मुख्य आरोपी हर्षल सेलूकर, निखिल निखारे यांच्यावर अगोदरच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितले. निखिल निखारे याला पोलिसांनी अटक केली आहे व मुख्य आरोपी हर्षल सेलूकरचा शोध पोलीस घेत आहेत.

Back to top button