नागपूर : प्रेम प्रकरणातील वाद सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावर धारधार शस्त्राने हल्ला, आरोपींची पोलिसांनी काढली धिंड | पुढारी

नागपूर : प्रेम प्रकरणातील वाद सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावर धारधार शस्त्राने हल्ला, आरोपींची पोलिसांनी काढली धिंड

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मित्राचा प्रेम प्रकरणाचा वाद मिटविण्याकरीता गेलेल्या तरुणावर धारधार शस्त्राने हल्ला केल्याची घटना आज (दि. १४) पाचपावली पोलीस स्टेशन परीसरात घडली. या घटनेतील जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत तरुणाचे अभिषेक असे नाव असून. आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आशिष बडल या तरुणाचा प्रेयसीसोबत झालेला वाद मिटवण्याच्या उद्देशाने अभिषेक हा तरुण रात्री घटनास्थळी भेटायला आला. या दरम्यान आरोपी रोहित नाहरकर, शाम कुसेरे, राजकुमार लाचलवार यांच्यासोबत अभिषेकचा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी अभिषेकवर विटा व तलवारीने मानेवर वार करुन गंभीर जखमी करीत घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत अभिषेक यास तत्परतेने जखमी अवस्थेत मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सदरील आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, त्यांची लोकांच्या मनातील दहशत घालवण्यासाठी पोलिसांनी आरोपीची धिंड काढली व खुनाच्या गुंन्ह्यासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती प्रवीण सोमवंशी, सहाय्यक पोलिस निरीक्षक पाचपावली यांनी दिली.

Back to top button