

पुढारी ऑनलाईन डेस्क: कालपासून राज्यातील मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात अवकाळी पावसाने पुन्हा झोडपले आहे. दरम्यान पुढील २४ तासांत विदर्भातील काही भागांत पुन्हा अवकाळीचा फटका बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या संदर्भातील माहिती पुणे हवामान विभागप्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे. (Weather Forecast)
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात कोकण वगळता उर्वरित राज्यातील काही भागांत शुक्रवारी आणि शनिवारी हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, राज्यातील किमान व कमाल तापमानात 3 ते 5 अंशांनी वाढ झाली आहे. उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे. त्या भागात पश्चिमी चक्रवाताचा जोर कायम आहे. मात्र, महाराष्ट्रात तापमानवाढीस सुरुवात झाली आहे. दोन दिवस हलक्या पावसाचा अंदाज आहे. (Weather Forecast)