सलग तिसर्‍या दिवशीही 12 उड्डाणे रद्द; खराब हवामानाचा प्रवाशांना फटका | पुढारी

सलग तिसर्‍या दिवशीही 12 उड्डाणे रद्द; खराब हवामानाचा प्रवाशांना फटका

पुणे : पुढारी वृत्तसेवा : उत्तर भागात असलेल्या खराब हवामानाचा फटका सलग तिसर्‍या दिवशी मंगळवारी विमानांना बसला. परिणामी, पुण्यातून ये-जा करणार्‍या 12 विमानांची उड्डाणे रद्द करावी लागली. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. सलग तिसर्‍या दिवशी पुणे विमानतळावरील विमानांच्या फेर्‍या रद्द होत आहेत. मंगळवारी पुण्यातून जाणारी 5 विमाने रद्द झाली. यात दिल्लीसाठी होणारी तीन, गुवाहाटीसाठी होणारे एक, कोलकातासाठी होणार्‍या एका विमानाचे उड्डाण मंगळवारी रद्द झाले.
तर, पुण्यात येणारी 7 विमाने रद्द झाली. यात दिल्लीतून पुण्यात येणारी चार, कोलकातावरून येणारे एक, गुवाहाटीवरून येणारे एक आणि गोव्यावरून येणारे एक विमान रद्द झाले. अशा एकूण बारा विमानांच्या फेर्‍या पुणे विमानतळावरून रद्द झाल्या. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. पुणे विमानतळावरून दररोज 180 च्या घरात विमानांची उड्डाणे होत असतात. त्यातुलनेत रद्द होणार्‍या विमानांची संख्या 10 ते 20 आहे. परंतु, एका विमानात 1500 ते 200 च्या घरात प्रवासी असतात. जर दिवसाला 12 ते 20 च्या घरात विमाने रद्द होत असतील तर सुमारे चार हजार प्रवाशांचा नियोजित प्रवास  थांबत आहे. त्यामुळे प्रवाशांची अनेक कामे अडकत असून, त्यांना प्रचंड मनस्ताप होत आहे.
खराब हवामानामुळे सोमवारी 20 विमान फेर्‍या रद्द झाल्या होत्या, तर मंगळवारी 12 विमान फेर्‍या रद्द झाल्या. त्या पार्श्वभूमीवर संबंधित विमान कंपन्यांकडून सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. तसेच, पुणे विमानतळ प्रशासन आणि सीआयएसएफकडून सुध्दा प्रवाशांच्या सोयीसाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत.
– संतोष ढोके, संचालक, पुणे विमानतळ

प्रवाशांची गैरसोय

पुण्यात येणारी तसेच पुण्यातून इतरत्र जाणारी अशी 12 विमानांची मंगळवारी उड्डाणे रद्द झाली. त्यामुळे प्रवाशांना पुन्हा गैरसोयीचा सामना करावा लागला. तसेच जे इतर शहरातील प्रवासी आहेत. त्यांना नाइलाजास्तव पुणे विमानतळ टर्मिनलवरील बाकड्यांवरच मुक्काम करावा लागला. या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
  • विमान प्रवासी वैतागले; उत्तरेकडील धुक्याचा परिणाम
  • सर्वाधिक दिल्लीकडील उड्डाणे करावी लागली रद्द
  • विमानतळावरच
  • प्रवाशांचा मुक्काम

हेही वाचा

Back to top button