सन 1528 साली बाबरचा सेनापती मीर बाकी याने मंदिर तोडलं, या मागची त्यांची संकल्पना होती की, जोपर्यंत भारतीयांच्या मनातून राम आणि कृष्ण काढणार नाही, तोपर्यंत भारतीयांना गुलाम करता येणार नाही. म्हणून त्या ठिकाणचे राम मंदिर पाडून त्यांनी 'बाबरी'ढाचा बांधला. मुळात ती मशीद नव्हती तर हिंदूंच्या छातीवर उभा केलेला एक ढाचा होता. जो हे सांगत होता की, तुम्ही आमचे गुलाम आहात आणि तुमचे रामही तुम्हाला वाचवू शकणार नाहीत. यासाठी साधुसंत अनेक वीरांनी लढाई केली, यासाठी 18 लढाया झाल्या. ज्यामध्ये अनेक लोक शहीद झाले तरीही संघर्ष सुरूच होता. राजकीय स्वातंत्र्य मिळाले मात्र, सांस्कृतिक, अध्यात्मिक स्वातंत्र्य ही तेवढेच महत्त्वाचे आहे याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधले. (Ram Mandir PranPrathistha)