गोंदिया ; पुढारी ऑनलाईन गोंदिया तालुक्यातील बिरसी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेला प्रारंभ होणार आहे. इंडिगो कंपनीने या विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, गोंदिया-हैदराबाद- तिरुपती प्रवासी विमान वाहतूक सेवेला प्रारंभ होणार आहे.
ही विमान वाहतूक सुरू झाल्याने जिल्हावासीयांना एक प्रकारे दिवाळीची भेट मिळाली असून, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी आमदार राजू जैन यांनी दिली. नागपूर येथून जाणाऱ्यांना देखील हैदराबाद येथून विमानाने किंवा रेल्वेने जावे लागते. यादृष्टीने देखील ही विमानसेवा हैदराबाद, तिरुपती देवदर्शन, पर्यटनाच्या दृष्टीने वैदर्भीयांसाठी उपयुक्त ठरणार आहे हे विशेष.
हेही वाचा :