पुढारी ऑनलाईन डेस्क : दिवाळी दिवशी मुहूर्त ट्रेडिंगची परंपरा आहे. या दिवशी बाँबे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर एक तासाचे सत्र ठेवले जाते. या वेळेत गुंतवणूकदार, व्यापारी व्यवहार करतात. येत्या आर्थिक वर्षांत संपन्नता आणि भरभराट येवो यासाठी ही मुहूर्ताचे ट्रेडिंग केले जाते. मुहूर्ताच्या ट्रेंडिंगसाठीची वेळ सहसा संध्याकाळी असते. ही वेळा भारतीय परंपरानुसार ठरवली जाते. (Diwali Muhurat Trading History)
दिवाळी मुहूर्तावेळी आर्थिक व्यवहार सुरू करण्याची प्रथा राजा विक्रमादित्यच्या काळात सुरू झाली. आपल्या राज्याची भरभराट व्हावी आणि आर्थिक संपन्नता यावी यासाठी विक्रमादित्याने ही परंपरा सुरू केली. भारतीय शेअर बाजारात सुरुवातीपासूनची ही परंपरा सुरू होती. १९५७ला बाँबे स्टॉक एक्सचेंजने मुहूर्त ट्रेडिंग अधिकृतरीत्या सुरू केला. त्यानंतर नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्येही मुहूर्ताचे ट्रेडिंग सुरू झाले. पूर्वी ऑनलाईन ट्रेडिंगची पद्धत नव्हती. तेव्हा ट्रेडर, ब्रोकर्स शेअर बाजारात हजर राहून हा व्यवहार करायचे. (Diwali Muhurat Trading History)
दिवाळी शेअर बाजार बंद असतो. फक्त दिवाळी दिवशी एक तास मुहूर्ताचे ट्रेडिंग असते. एका तासाचा हा वेळ स्टॉक, डेरिव्हेटिव्हज, कमोडिटी यांच्यासाठी स्टॉटमध्ये विभागला जातो. मुहूर्ताच्या ट्रेंडिंगपूर्वी पूजा, मंत्रपठणही होते. मुहूर्ताच्या ट्रेडिंगमधून आर्थिक वर्षांची सकारात्मक सुरुवात केली जाते, यातून पूर्ण वर्षांचा ट्रेंड ठरतो, त्यामुळे या दिवशी शेअर बाजार कसा राहिला, याकडे बारकाईने लक्ष दिले जाते.
हेही वाचा