Elvish Yadav : बिग बॉस विजेता एल्विश यादव याच्यावर सापांच्या विष तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल | पुढारी

Elvish Yadav : बिग बॉस विजेता एल्विश यादव याच्यावर सापांच्या विष तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल

पुढारी ऑनलाईन डेस्क : ‘बिग बॉस ओटीटी २’ चा विजेता एल्विश यादववर ( Elvish Yadav ) ड्रग्ज ( रेव्ह) पार्ट्यांमध्ये सापांचे विष पुरविल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात एल्विशसह इतर ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील पाच जणांना नोयडा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात राहुल, टीटूनाथ. जयकरण, नारायन आणि रविनाथ अशी अटक केल्याल्याची नावे आहेत.

संबंधित बातम्या 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडा येथील एका रेव्ह पार्टीत एल्विश ( Elvish Yadav ) विषारी सापांना घेवून आला होता. दरम्यान नोयडा पोलिसांनी पार्टीत छापा टाकून ५ जणांवर ताब्यात घेतले. मात्र, एल्विश हा फरारी झाला. त्याचा पुढील तपास नोयडा पोलिस करत आहेत. त्याच्याकडील ९ विषारी सांपाची सुटका करण्यात आली आहे.

एल्विश यादववर नोएडा (Noida) आणि एनसीआरमध्ये (NCR) येथे विषारी सापांचे विष पुरविणाऱ्या ड्रग्ज पार्टीचे आयोजित केल्याचा आरोप लावला आहे. या प्रकरणानंतर नोएडाच्या सेक्टर ४९ पोलिस ठाण्यात एल्विशसह ५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

मेनका गांधी यांच्याशी संबंधित असलेल्या एका संस्थेने, एल्विश यादव हा ड्रग्ज पार्ट्यांमध्ये विषारी सापांचे विष पुरवत असून तो त्याचे व्हिडिओदेखील शूट करत असल्याची माहिती समोर आणली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी एका व्यक्तीच्या मदतीने रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यासाठी एल्विशला संपर्क साधला होता. यानुसार एल्विश त्याच्याकडील विषारी सापांना घेवून आला होता. दरम्यान पोलिसांनी छापा टाकत राहुल, टीटूनाथ. जयकरण, नारायन आणि रविनाथ या पाच जणांना ताब्यात घेतले आहे. मात्र, एल्विशचा तपास सुरू आहे.

Back to top button