नागपूर; पुढारी वृत्तसेवा : medical student murder : नागपुरातील निवासी डॉक्टरांनी आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यवतमाळ वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या अशोक पाल याची दोन दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली. या हत्येच्या निषेधार्थ नागपुरातील निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे.
निवासी डॉक्टरांसह एमबीबीएसचे विद्यार्थी देखील या संपात सहभागी होणार आहेत. अशोक पाल यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची भरपाई देण्यात यावी, मारेकऱ्यांना बारा तासाच अटक करावी आणि आरोग्यसेवकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षकाची नियुक्ती करावी अशी नागपुरातल्या निवासी डॉक्टरांची मागणी आहे.
बाह्यरुग्ण विभागात आलेले रुग्ण आल्या पावली परत गेले. मेडिकल प्रशासनाने इतर डॉक्टरांना बाह्यरुग्ण विभागात कर्तव्यावर ठेवले, परंतु खुर्चीत डॉक्टर हजर नसल्याची तक्रार रुग्णांच्या नातेवाइकांनी केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांच्या सेवेसाठी निवासी डॉक्टर आहेत. परंतु त्यांनाच मारहाण केली जाते.
भावी डॉक्टर असलेल्या अशोक पाल या विद्यार्थ्याचा हत्या करण्यात आली त्या आरोपीला अटक करावी. तसेच कुटुंबीयांना ५० लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी. तसेच वॉर्डात सुरक्षारक्षक तैनात ठेवण्यात यावी. अशी मागणी संपकरी डॉक्टरांनी केली आहे.