संजय राऊत हे रोज ज्या पद्धतीने भाजपवर टीका करत आहेत, ती वक्तव्ये बघितली तर आता त्यांची कीव यायला लागलीय. राजकारणासाठी एखाद्याने किती लाचार व्हावं यालाही मर्यादा आहेत. आज बाळासाहेब जिवंत असते, तर त्यांनी राऊतांच्या एक थोबाडीत दिली असती, असा घणाघात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाशिकमध्ये बोलताना केला.
नाशिकमधील विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी भाजपचे काही नेते एकत्र आली आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी त्रिपुरा घटनेवर महाराष्ट्रात उमटलेल्या पडसादावरून शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. या घटनेवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी, रझा अकादमी हे भाजपचे पिल्लू असून, त्यांच्याच पाठिंब्यावर राज्यात दंगली होत आहेत. अन्यथा त्रिपुरातील दंगलींचे पडसाद महाराष्ट्रात घडण्याचे काय कारण असा सवाल उपस्थित केला होता. या वक्तव्याचा चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेत, राऊत उठसुठ ज्या पद्धतीने वक्तव्य करतायत ते ऐकुण त्यांची किव येवू लागलीय. राजकारणासाठी एखाद्याने किती लाचार व्हावं यालाही मर्यादा आहेत. आजच्या घडीला स्वर्गीय बाळासाहेब जिवंत असते, तर त्यांनी त्यांच्या एक थोबाडीत मारली असती, अशी जोरदार टीका यावेळी केली.
राज्यात कोणतीही घटना घडली की सत्ताधारी भाजपवर शंका घेताना दिसत आहे. मग ते एसटी कर्मचाऱ्यांचा संप असेल, आरोग्य पेपर फुटीचे प्रकरण असेल अथवा शेतकऱ्यांचे थकवलेले पैसे असतील. सुरू असलेली ही चेष्टा सर्वसामान्यांना कळत नाही का ? सगळीकडे भाजपचा हात दिसत असेल तर भाजपचा हात कापून काढा. तुम्हाला कोणी अडवलं आहे असा सल्ला पाटील यांनी यावेळी दिला.
यानंतर पाटील पुढे म्हणाले की, मुस्लिमांची मते मिळवून तुम्ही खुशाल राज्य करा, तुम्हाला कोण अडवतंय. 5 टक्के मुस्लिम गडबड जरूर करत असतील पण उर्वरीत 95 टक्के मुस्लिम नक्कीच प्रामाणिक आहेत. ज्यांनी मालेगाव तसेच नांदेडमध्ये सामाजिक शांतता बिघडवली त्यावर पूर्वी सारखी टीका करा. मुस्लिम मतांची काळजी करू नका. गडबड करणाऱ्या 5 टक्के मुस्लिमांवर तुम्ही कोणतीच टीका करणार का ?, असा सवालही त्यांनी यावेळी केला. त्रिपुरातील घटनेचा अमरावतीत निषेध करण्यात आला त्यावेळी माजी मंत्री जगदीश गुप्तांचे ऑफिस फोडले की नाही? याचा अहवाल पोलीसांनी प्रामाणिकपणे द्यावा असं सांगितले.
राज्यात कोणतीही घटना घडली की सत्ताधारी भाजपवर शंका घेताना दिसत आहे. मग ते एसटी कर्मचाऱ्यांचा संप असेल, आरोग्य पेपर फुटीचे प्रकरण असेल अथवा शेतकऱ्यांचे थकवलेले पैसे असतील. सुरू असलेली ही चेष्टा सर्वसामान्यांना कळत नाही का ? सगळीकडे भाजपचा हात दिसत असेल तर भाजपचा हात कापून काढा. तुम्हाला कोणी अडवलं
– चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
हे ही वाचा :