…तर सव्वादोन वर्षापूर्वीच ठाकरे सरकार पडले असते : अनिल देशमुख | पुढारी

...तर सव्वादोन वर्षापूर्वीच ठाकरे सरकार पडले असते : अनिल देशमुख

वाशीम: पुढारी वृत्तसेवा: सव्वा दोन वर्षापूर्वी मला ऑफर होती, आणि मी जर तेव्हा समझोता केला असता, तर मला काहीही झाले नसते, मात्र तेव्हाच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पडले असते, असा खळबळजनक खुलासा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. Anil Deshmukh

देशमुख पुढे म्हणाले की, आमदार अपात्रतेची सुनावणी आज विधानभवनात पार पडली. मात्र, पुढील सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार आहे. आमदार अपत्रतेच्या सुनावणीसाठी वेळकाढूपणा केला जात आहे. तारीख पे तारीख दिल्या जात असून कोणाला न्याय द्यायचा, नसेल तर असा वेळ काढूपणा केला जातो. तर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. विधानसभा अध्यक्षांनी लाईव्ह सुनावणी घ्यायला पाहिजे, असेही देशमुख यावेळी म्हणाले. Anil Deshmukh

भाजप नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी योग्य निर्णय घ्यावा, पंकजा मुंडे यांच्यावर त्यांचाच पक्ष अन्याय करत आहे. भाजपला मोठे करण्याचे काम दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी केले आहे. त्यांच्याच कन्येवर पक्षाच्या माध्यमातून अन्याय केला जात आहे, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यांनी योग्य तो विचार करून निर्णय घ्यावा, असा सल्ला देशमुख यांनी मुंडे यांना यावेळी दिला.

हेही वाचा 

Back to top button