Vijay Wadettiwar On Ajit Pawar : …भाजपसाठी अजित पवार म्हणजे ‘युज अँड थ्रो’; मुख्यमंत्री करणार नाहीत: विजय वडेट्टीवार

Vijay Wadettiwar On  Ajit Pawar : …भाजपसाठी अजित पवार म्हणजे ‘युज अँड थ्रो’; मुख्यमंत्री करणार नाहीत: विजय वडेट्टीवार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा: उपमुख्यमंत्री अजित पवार म्हाविकास आघाडीत असते, तर एकवेळ मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण झाले असते, पण महायुतीत ते शक्य नाही. केवळ आपल्या स्वार्थासाठी भाजप अनेकांचा वापर करते, युज अँड थ्रो भूमिकेत भाजपसोबत गेल्याने अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत, त्यांचा वापर कधीपर्यंत करायचा याचे वेळापत्रक ठरले आहे, असा खळबळजनक दावा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज (दि. १६) माध्यमांशी बोलताना केला. (Vijay Wadettiwar On Ajit Pawar)

Vijay Wadettiwar On Ajit Pawar : विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिला तर भूकंप होणार

दरम्यान, मंत्री शंभूराज देसाई नेहमी भूकंप होईल असेच म्हणतात.. मात्र तो होत नाही..हो नक्कीच भूकंप होईल, जर विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतला, तर भूकंप होईल… त्याचे धक्के कसे असतील, हे शंभूराज देसाई यांना कळणार नाही, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला. (Vijay Wadettiwar On Ajit Pawar)

महायुतीची वाट लागली आहे. अनेकांना महायुतीत जाऊन चुकले म्हणून पश्चाताप होत आहे. अनेक जण उद्धव ठाकरे यांचे संपर्कात आहेत, शरद पवार यांच्या जवळ जाऊन काहीजण रडत आहेत. थोडेसे पैसे आम्हाला कमावू द्या, त्यानंतर आम्ही पुन्हा तुमच्याकडे येतो, अशी परिस्थिती सध्या आहे. आमचा वाटा कमी करू नये, मराठा जर शक्ती प्रदर्शन करत असेल, तर ओबीसी संघटनांची कृती समिती गठीत करून सभेची तयारी करत आहोत. आम्ही साडेतीनशे जातींचा ओबीसी समाज आहे, आज सगळ्यांच्या भूमिकेतून मराठा समाज आंदोलनाला अदृश्य शक्ती पाठिंबा देत आहे, क्रिमिलियरमध्ये वाढ मिळायला पाहिजे, बैठकीचे मिनिटस तयार होत नाहीत, केवळ बैठकीचे फार्स होतात. पुढील महिन्यात संविधान दिनी नागपुरात सभा घेण्याचा प्रयत्न आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news