समृद्धी अपघातप्रकरणी राज्य सरकारवर गुन्हा दाखल व्हावा : विजय वडेट्टीवार | पुढारी

समृद्धी अपघातप्रकरणी राज्य सरकारवर गुन्हा दाखल व्हावा : विजय वडेट्टीवार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : समृद्धी महामार्ग सुरू करीत असताना सोयी सुविधा असणे गरजेचे होते, खूपच घाई करण्यात आली. निलंबनाने प्रश्न सुटणार नाहीत. आरटीओला नाक्यावर गाडी थांबवता आली असती, खरेतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनीच हा रस्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन आणि वाहतुकीस खुला करण्याची घाई केली. राज्य सरकारवर कारवाई झाली पाहिजे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा सरकारवर दाखल झाला पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. (Vijay Wadettiwar)

आज रविभवन येथे ओबीसी सामाजिक संघटनांची बैठक वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने पार पडली. यानिमित्ताने ते माध्यमांशी बोलत होते. ही बैठक पक्षाशी संबंधित नाही. यात सर्व ओबीसी संघटनांना बैठकीसाठी बोलावले. मनोज जरांगे- पाटील त्यांचा भूमिकेवर ठाम आहेत, या स्थितीत ओबीसी समाजाची भूमिका काय? यासाठी ही बैठक होती, सामाजिक संघटनांची आणि पक्षापलीकडे जाऊन ओबीसी हितासाठी ही बैठक आहे. (Vijay Wadettiwar)

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पक्षाची बैठक घेत आहेत. सर्वांमध्ये समन्वय साधण्यासाठी बैठक आहे. राजकीय आरक्षण पाहता, निवडणुकीत ओबीसीचे आरक्षण अगोदरच कमी झाले आहे. त्यामुळे यावर चर्चा झाली. ललित पाटीलला पळवण्यात सत्ताधाऱ्यांचा समावेश आहे. ललित पाटील सापडला तर त्यांचे पितळ उघडे पडेल, त्यामुळे तो सापडत नाही, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

हेही वाचा 

Back to top button