नागपूर: अनैतिक संबंधातून होमगार्डचा खून, मध्यप्रदेशात सापडला मृतदेह

नागपूर: अनैतिक संबंधातून होमगार्डचा खून, मध्यप्रदेशात सापडला मृतदेह
Published on
Updated on
 नागपूर: पुढारी वृत्तसेवा: नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गालगत बोर्डा शिवारात आशिष पाटील या २७ वर्षीय होमगार्डचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. पाटील याची अनैतिक संबंधातून  त्याच्याच शेजारी राहणाऱ्या कुणाल नाईकने  हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून नाईक याने पाटील याचा खून केल्याचे तपासात उघड झाले आहे. कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
स्थानिक बसस्थानकाजवळ आशिषची मोटारसायकल रक्ताच्या थारोळ्यात सापडल्याने तपास सुरू झाला. पीआय सार्थक नेहते यांच्या नेतृत्वाखाली कन्हान पोलिसांना तपासात प्रत्यक्षदर्शींनी  मदत केली. या शोध मोहिमेदरम्यान मध्य प्रदेशच्या अधिकाऱ्यांनी नागपूर ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला. दरम्यान, नागपुरातून निघालेल्या एका वाहनात एक मृतदेह सापडल्याचे उघड झाले. तत्काळ  कन्हान पोलिसांनी हा मृतदेह आशिष पाटीलचा असल्याची पुष्टी केली. या हत्याकांडनंतर नाईकने पाटील याचा मृतदेह कारमध्ये ठेवला आणि मध्य प्रदेशकडे रवाना झाला.
मात्र, पोलिसांनी  फरार आरोपी कुणाल नाईकचा शोध घेत त्याला बेड्या ठोकल्या. आणि या हत्याकांडाचा उलगडा झाला.
हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news