नागपूर : विमानात महिला प्रवाशाशी अश्लील चाळे करणाऱ्या अभियंत्याला अटक

प्रातिनिधिक छायाचित्र.
प्रातिनिधिक छायाचित्र.
Published on
Updated on

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : विमानात महिला प्रवाशाशी अश्लील चाळे करणाऱ्या एका अभियंत्याला सोनेगाव पोलिसांनी अटक केली आहे. फिरोज शेख नूर मोहम्मद शेख (वय ३२, रा. दर्रानी कॉम्प्लेक्स कोंडवा, पुणे), असे या अटकेतील अभियंत्याचे नाव आहे.

यातील संशयित आरोपी एका खासगी कंपनीत कार्यरत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पुण्याहून इंडिगोच्या विमानाने सोमवारी (दि. ९) दुपारी नागपूरला निघाली होती. याच विमानात संशयित आरोपी फिरोज हा प्रवास करीत होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीवर उरताना फिरोजने इशारा करून या महिलेशी अश्लील चाळे केले. महिलेने त्याला लगेच विरोध करीत खडसावले. दरम्यान, सदर महिला आणि फिरोज खाली उतरले. त्यानंतरही तो पीडित महिलेशी लगट करण्याच्या प्रयत्नात असल्याने या महिलेने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानाकडे तक्रार केली. शेवटी जवानाने फिरोजला पकडून सोनेगाव पोलिसांना माहिती दिली. सोनेगाव पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक वाघ यांच्यासह पोलिसांचा ताफा विमानतळावर पोहचला. पोलिसांनी फिरोज व पीडित महिलेला पोलिस ठाण्यात आणले. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अखेर फिरोजला अटक केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news