नाना पटोले आणि कॉंग्रेसला जनतेला समजून सांगता येत नाही, त्यामुळे ते लोकांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहेत,असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज केला. ओबीसी आंदोलनात मोर्चा झाल्यावर आंदोलन स्थगितीवरून आता राजकारण सुरू झाल्याचे उघड झाले आहे. भाजपने हे आंदोलन संपविले असा आरोप होत असताना बावनकुळे यांनी उत्तर दिले. बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी श्री गणरायांचे आगमन झाले. त्यांनी सहकुटुंब श्रींची प्रतिष्ठापना व पूजन केले. श्री गणेशाचे आगमन सर्वांच्या जीवनात आनंद व सुखाचे नवे पर्व घेऊन येवो, अशी प्रार्थना केली.