फडणवीस यांनी लपाछपीचा खेळ थांबवावा : नाना पटोले 

 संग्रहित फोटो
संग्रहित फोटो
Published on
Updated on
नागपूर, पुढारी वृत्‍तसेवा : ओबीसीच्या मोर्चा, आंदोलनात कालचे चित्र आम्‍ही पाहिले आहे. त्यात भाजपचेच नेते आंदोलन करत आहे असे चित्र होते. हे लोक सत्तेत असताना सरकार विरोधात आंदोलन करत आहेत का हा प्रश्न आहे. यामुळे आंदोलनात फूट पडल्याचे चित्र दिसत आहे. खरेतर हा लपाछपीचा खेळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपविला पाहिजे. ते मराठा आणि कुणबी समाज समोरासमोर संभ्रम निर्माण करत आहेत. मूळ मुद्द्यापासून लक्ष विचलित केले आहे असा आरोप  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा आरोप धुडकावत काँग्रेस संभ्रमाचे राजकारण करीत असल्याचा प्रत्त्यारोप केला. कुणबी कृती समितीने वेगळी भूमिका घेतली तरी ओबीसी महासंघ आंदोलनात कायम असून बबनराव तायवाडे हे प्रामाणिक नेते आहेत. ते चांगलं काम करत आहेत. मुळात ओबीसी आंदोलन हा राजकीय विषय होऊ शकत नाही, मी विधानसभा अध्यक्ष असताना ओबीसी सेन्सेक्सचा विषय मी आणला. खूर्चीचा वापर समाजासाठी आणि पीडितांसाठी व्हावा ही कॉंग्रेसची भूमिका आहे .मी आंदोलन केले तर लाखो लोक आंदोलनात आणू शकतो असा दावा केला.
दरम्यान, शेड्युल 10 नुसार आमदार अपात्र प्रकरणी कारवाई व्हायला हवी. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही प्रक्रिया लांबविली आम्ही त्यावर हरकत घेतली. त्याच प्रकरणी सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले. प्रथा, परंपरा, लोकशाहीच्या संकेताचं पालन व्हायला पाहिजे. वेगळा विदर्भ झाल्यास तो विदर्भासाठी नाही तर त्यांच्या स्वार्थासाठी हवा आहे. संसद अधिवेशनात काय चमत्कार होईल हे पाहतोय. दिवसाढवळ्या काय होणार हे पाहावे लागेल. भाजप प्रणित व्यवस्थेत जबरदस्ती आणलेले लोक जे ईडी, सीबीआयच्या धाकाने आणले यांचं महत्व किती हे अधोरेखित काही नेते करत आहेत.2014 पासून राज्यात पर्सनल अजेंडा घेऊन व्यक्तिगत हल्ले केले जात आहेत. दिल्लीचे हस्तक बनून काम करण्यापेक्षा जनतेसाठी काम करावे, सत्ताधाऱ्यानी अशी अपेक्षा बोलून दाखविली. विरोधीपक्षाला न विचारता अधिवेशन घेणे हे चूकीचे नाही का असा सवालही त्‍यांनी यावेळी केला.
दरम्यान, पटोले म्हणाले, गणपती बाप्पा रिद्धी सिद्धीची देवता आहे, सुखकर्ता आणि  दुःखहर्ता आहे. राज्यात दुःखी लोक अधिक आहे ते सुखी व्हायला हवेत. शेतकरी आणि तरुणाईचे प्रश्न सुटायला पाहिजे. महिला बिल येणार असे मला तरी वाटत नाही. कॅबिनेट मध्ये चर्चा झाली त्यातली नोट  दिसत नाही. विशेष अधिवेशनाची भूमिका अजून स्पष्ट नाही विरोधीपक्षाला न विचारता अधिवेशन घेणं हे भयावह आहे. देशात चांगले काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यामध्ये काँग्रेसचे भुपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा समावेश आहे यावर पटोले यांनी भर दिला.नवीन संसदेत अधिवेशन घेण्याचा मुख्य उद्देश काय हे कोडेच असल्याची भावना बोलून दाखविली.
.हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news