कारवाईचा सेल्फी काढण्यात पोलीस अधिकारी व्यस्त ; गुन्हेगारी व अवैध व्यवसाय मोकाट | पुढारी

कारवाईचा सेल्फी काढण्यात पोलीस अधिकारी व्यस्त ; गुन्हेगारी व अवैध व्यवसाय मोकाट

पारनेर प्रतिनिधी :  तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे होत असताना काही दिवसापूर्वी पोलिसांनी पठारवाडी येथे थातूरमातूर कारवाई करून बनावट दारू अड्डा नष्ट केला. हे करत असताना पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. त्या गोष्टीची तालुक्यात चांगलीच चर्चा झाली. याबाबत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. पारनेर तालुक्यात राजरोसपणे अनेक गुन्हे घडत आहेत. त्याची रीतसर फिर्याद दाखल होते. मात्र या गुन्ह्यांची माहिती पत्रकारांना दिली जात नाही तर दुसरीकडे थातूर-मातुर कारवाई केलेली माहिती देण्यात मात्र पोलीस प्रशासन धन्यता मानतात व त्या बातम्या छापून आणून स्वतःची पाठ थोपटली जाते.
पारनेर बस स्थानक हे शाळा कॉलेज सुटण्याच्या वेळेस गजबजलेले असते येथे शाळा व कॉलेजमधील मुलींना टुकार मुलांकडून त्रास दिला जातो. चार-पाच दिवसापूर्वी बस स्थानक परिसरात एका तरुणाने चार चाकी च्या सनरूफ मधून डोकावत थेट पोलीसांना सलामी ठोकली आहे.

संबंधित बातम्या :

येत्या काळात गणेश उत्सव रमजान ईद नवरात्र दीपावली आदी सण उत्सव आहेत. यावेळी कायदा सुवेवस्था राखण्यासोबत गुन्हेगारावर वचक निर्माण करावा लागणार आहे. तालुक्याचे क्षेत्रफळ मोठे पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे हे हे मुख्य कारण असले तरी असणारे कर्मचारी यांच्याकडूनच अनेक वेळा अवैध व्यवसायांवर डोळेझाक होत असते त्यामुळेच व्यवसायिक खुलेआमपणे व्यवसाय सुरू ठेवत असतात. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. गुन्हे सातत्याने वाढत असताना आता अवैध धंदे फोफावल्याचे विदारक चित्र आहे. मटका, हातभट्टी दारू, सौरट, गुटख्याला बंदी असतानाही गुटखा राजरोसपणे विकला जातोय.

पारनेर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध व्यवसाय सुरू असून दारू परवानाधारक हॉटेल पेक्षा विनापरवाना हॉटेल मोठ्या प्रमाणात आहे. त्याच अनेक हॉटेलमध्ये बनावट दारू विक्री केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचप्रमाणं मटका, गुटका, बिंगो हे उद्योग पोलिसांच्या आशीर्वादाने सुरू असल्याची चर्चा आहे. तालुक्यात अवैधरीत्या चालणाऱ्या दारू अड्ड्याकडे दुर्लक्ष कसे झाले अवैधरीत्या दारू व्यवसाय तालुक्यात मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याला कायमस्वरूपी निर्बंध का लागत नाही यावर देखील विचार होणे गरजेचे आहे. हॉटेल व ढाब्यांवर जुजबी कारवाई करून कारवाई केला जातो मात्र यातून देखील मोठी उलाढाल होत असल्याचे बोलले जात आहे. तालुक्यात अवैध दारू विक्री करणारे अनेक धाबे हॉटेलवर विनापरवाना बनावट दारू विकणारे व्यवसायिक आहेत. त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही कारण वसुली च्या माध्यमातून महिन्याला मोठा मलिदा मिळत असल्याची माहिती एका हॉटेल व्यवसायिकानी नाव न छापण्याच्या अटीवर दिली आहे.

गुन्हेगारी वर धाक सहकाऱ्यांना लगाम !
पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी जामखेड मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती तशाच प्रकारची कामगिरी पारनेर तालुक्यातील नागरिकांना अपेक्षित आहे मात्र अद्याप तसे दिसून येत नाही या पुढील काळात त्यांना गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासोबतच सहकार्यांना दिलेल्या मोकळीकेला लगाम लावावा लागणार आहे.

बनावट दारू विना परवाना हॉटेलची संख्या जास्त !
तालुक्यातील पारनेर ते आळकुटी पर्यंत अनेक हॉटेल आहेत पारनेर ते सुपा या रोड हॉटेल आहे सुपा हद्दीत नगर पुणे हायवे ये वर अनेक हॉटेल ला दारू विक्री परवाना नाही पारनेर ते टाकळी ढोकेश्वर टाकळी ढोकेश्वर ते पारनेर हद्दीतील गावांमध्ये हॉटेल आहेत तसेच पारनेर ते भाळवणी येथे देखील विनापरवाना हॉटेल आहेत मात्र त्या सर्व हॉटेल वर अवैधरित्या बनावट दारू विक्री करत असल्याचे दिसूनही कोणाच्या आशीर्वादाने कारवाई होत नाही.

Back to top button