

अकोले : पुढारी वृत्तसेवा : दुपारचे ३ वाजलेले…अकोले शहरातील पोलिस गांऊडवर दोन गटात हाणामा-या….पोलिस अधिकारी व इतर पोलिस काट्या, रायफलसह उपस्थित होताच पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या जमावावर लाठीचार्ज करतानाचे दृश्य पाहून अकोलेकर घाबरले होते. पण मात्र गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक दाखवल्याचे लक्षात आल्यावर नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.
अचानक उद्भवलेल्या परिस्थिती मध्ये मोठ्या संख्येत जमाव असेल तर त्यावेळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी कशा प्रकारे परिस्थितीवर मात करावी,त्याचबरोबर पोलिसांजवळील हेल्मेट, ढाल, काठी, रायफल इत्यादी साधनं वित्तीय आणि जीवित हानी न होता कशी वापरावी याचं प्रात्यक्षिक केलं गेलं. अचानक उद्भवलेल्या परिस्थितीवर काबू आणण्यासाठी अँब्युलन्स आणि अग्निशमन दल यांनाही सामावून घेण्यात येतं जेणेकरून जखमी व्यक्तींवर तत्काळ उपचार होईल आणि जमाव पांगत नसेल तर पाण्याच्या फवाऱ्याचा वापर करून जमाव पांगवण्यासाठी अग्निशमन गाडीचा वापर होतो असे पोलीस निरीक्षक विजय करे यांनी सांगितले.
तर अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला सो. यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय करे व राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दातरे,पो.उपनिरीक्षक भूषण हांडोरे,पो.उपनिरीक्षक कैलास खैरणार व सर्व पोलीस महिला – पुरुष कर्मचारी यांनी आजूबाजूचे नागरिक जमवून दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक केले.
हेही वाचा :