

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : पारडीचा उड्डाणपुल उदघाटनास सज्ज झाला असून केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, आमदार कृष्णा खोपडे यांनी रविवारी (दि.१७) रात्री या पुलाची पाहणी केली. मंगळवारी (दि.१९) गणेश चतुर्थीला या पुलाच्या तीन बाजू वाहतुकीसाठी खुल्या केल्या जाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रोसोबतच पारडी उड्डाणपुलाचे भूमिपूजन केले होते. मात्र, अनेक वर्षे या उड्डानपुलाचे काम रखडले होते . मेट्रो विस्तारामुळे या पुलाचे डिझाइन बदलण्यात आले. वर्दळीसह अपघातामुळे हा पारडी रस्ता ओळखला जात असून भंडारा, रायपूर, बिलासपूर महामार्गाला जोडणारा हा महत्वाचा मार्ग आहे.
हेही वाचा :