ओबीसी आणि मराठा समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न : डॉ.परिणय फुके | पुढारी

ओबीसी आणि मराठा समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न : डॉ.परिणय फुके

भंडारा, पुढारी वृत्‍तसेवा : मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध नाही. मात्र मराठाला मराठा कुणबी घोषित करून कुणबी म्हणजेच ओबीसींच्या आरक्षणात घुसखोरी केली जात आहे. त्यामुळे ओबीसी समाजकडून संताप व्यक्त होत आहे. मराठा आरक्षणाची मागणी करणारे जरांगे पाटील राज्यातील ओबीसी आणि मराठा समाजात फूट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात आरक्षण देण्याच्या निषेधार्थ रविवार १० सप्टेंबरपासून नागपुरातील आरबीआय चौकासमोर आंदोलन करण्यात येईल असे भाजप नेते डॉ.परिणय फुके माध्यमांशी बोलताना माहिती दिली.

फुके म्हणाले की, मी ओबीसी समाजाचा नेता असून त्या समाजाचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी समाजाचे आरक्षण देण्यास माझा विरोध आहे. मराठ्यांना आरक्षण देण्याच्या विरोधात नाही. राज्यात ओबीसी, मराठा आणि शेतक-यांच्या हिताचा विचार करणारे सरकार आहे. त्यामुळे सरकार ओबीसींवर अन्याय करणार नाही. ओबीसींच्या आरक्षणात घुसखोरी केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा फुके यांनी दिला.

-हेही वाचा 

पाहुण्यांपासून भारताची वास्तविकता लपवण्याची गरज नाही : राहुल गांधींचा केंद्रावर हल्लाबाेल

G20 Dinner : G20 डिनरचे आमंत्रण न मिळाल्याबाबत खर्गे म्हणाले, राजकारण…

नाशिक : मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नैताळेत सरणावर उपोषणाची तयारी

Back to top button