गडचिरोली : दोन वाघांचा पाणवठ्यावरील व्हिडिओ व्हायरल (Video) | पुढारी

गडचिरोली : दोन वाघांचा पाणवठ्यावरील व्हिडिओ व्हायरल (Video)

गडचिरोली, पुढारी वृत्तसेवा : मागील काही महिन्यांपासून वाघ आणि मानव यांच्यातील संघर्ष कमी झाला असला तरी अधूनमधून वाघांचे दर्शन होत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. देसाईगंज तालुक्यातील कोकडी गावानजीकच्या पाणवठ्यावर दोन वाघ पाणी पीत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या रस्त्याने जात असताना एका इसमाने वाघ पाणी पीत असतानाचे चित्रीकरण आपल्या मोबाईलमध्ये केले. दुसरीकडे, गुरूवारी एका वाघाने तुळशी-कोकडी गावात प्रवेश केल्यामुळे नागरिकांसह वन विभागाची चांगलीच तारांबळ उडाली होती.

हेही वाचलंत का?

Back to top button