स्‍व. डिडोळकर स्‍मृती ऑडिटोरियमाठी १५० कोटी : नितीन गडकरी | पुढारी

स्‍व. डिडोळकर स्‍मृती ऑडिटोरियमाठी १५० कोटी : नितीन गडकरी

नागपूर, पुढारी वृत्‍तसेवा : स्‍व. दत्‍ताजी डिडोळकर यांच्‍या स्‍मृतीप्रित्‍यर्थ राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्‍या परिसरात अडीच हजार क्षमता असलेले ऑडिटोरियम तयार होणार आहे. यासाठी उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५० कोटी रुपये देण्‍याचे कबूल केले आहे, अशी माहिती केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.

पुढे बोलताना नितीन गडकरी म्‍हणाले, झिरो माईल स्‍टेशनजवळ अंडरग्राउंड टनेल तयार केले आहे. या चौकाला दत्‍ताजी डिडोळकर यांचे नाव देण्‍यात येणार आहे. भावी पिढीला त्‍यांच्‍या कार्यातून प्रेरणा मिळावी, हा त्‍यामागील उद्देश आहे. दत्‍ताजींवर संघाचे संस्‍कार झाले होते.

डॉ. हेडगेवार, पं. पू गुरुजींसोबत त्‍यांचे अधिक दृढ संबंध होते. बाळासाहेब देवरस, भाऊराव देवरस, यशवंतराव केळकर यांच्‍यासारखेच त्‍यांचेही व्‍यक्तिमत्‍व प्रभावी होते. सामाजिक व आर्थिक एकामित्‍कता, संस्‍कारांच्‍या आधारे त्‍यांनी कार्यकर्त्‍यांचे व्‍यक्‍तीमत्‍व घडवण्‍याचे कार्य केले, असे सांगताना नितीन गडकरी यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. प्रत्‍येक वेळी कार्यकर्त्‍यांच्‍या पाठीशी उभे राहणारे दत्‍ताजी केवळ विद्वतापूर्ण वैचारिक मार्गदर्शक नव्‍हते तर एक सहृदयी कार्यकर्ता होते. सर्व कार्यकर्त्‍यांचा आधार असलेले दत्‍ताजी आधुनिक व्‍यवस्‍थापक होते, असेही ते म्‍हणाले. त्‍यांनी दत्‍ताजींसोबत सोबत काम केलेल्‍या प्राध्‍यापक अरविंद खांडेकर, मनोहर पारस्‍कर यांच्‍या कार्याचाही गौरव केला.

.हेही वाचा 

अलमट्टी भरल्याने महापुराचा धोका वाढला : आंदोलन अंकुश

‘पुढारी टॅलेंट सर्च एक्झाम’चे कुतूहल वाढले!

इथेनॉल प्रकल्प राबवा, हवी तेवढी मदत देऊ; अमित शहा यांची ग्वाही

Back to top button