भंडारा: सातवीतील मुलाचा मृत्यू; सहा महिन्यांपूर्वी झाला होता श्वानदंश | पुढारी

भंडारा: सातवीतील मुलाचा मृत्यू; सहा महिन्यांपूर्वी झाला होता श्वानदंश

भंडारा, पुढारी वृत्तसेवा : साकोलीजवळील सेंदुरवाफा येथील सातवीत शिकणाऱ्या मुलाचा कुत्रा चावल्याने मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. पियूष लेकाराम कापगते असे मृत मुलाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेवर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

६ महिन्यापूर्वी खेळत असताना अचानक कुत्र्याने पियूषचा चावा घेतला होता. परंतु चार दिवसांपूर्वी त्याचे हातपाय दुखू लागल्याचे त्याच्या वडिलांना सांगितले. त्याला खासगी रुग्णालयात प्रथमोपचारासाठी नेण्यात आले. परंतु रात्री अचानक पोट दुखल्याने पुन्हा दुसऱ्या रुग्णालयात नेऊन उपचार सुरू केला. परंतु प्रकृती अधिकच खालावल्याने सोमवारी त्याला नागपूर येथे हलविण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हेही वाचा 

Back to top button