

भंडारा, पुढारी वृत्तसेवा : पवनी तालुक्यातील चिचाळ गावालगतच्या चिचबोडी शेतशिवारात वीज पडल्याने 22 शेतमजुरांची प्रकृती अस्वस्थ झाली. मजुरांवर अड्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात दमदार पाऊस होत असल्याने शेतक-यांनी रोवणी हंगामाला धडाक्यात सुरुवात केली. दरम्यान अनेक ठिकाणी वीज पडण्याच्या घटना घडत आहेत. चिचबोडी शेतशिवारात वीज पडल्याने 22 मजुरांवर प्रकृती अस्वस्थतेची वेळ आली. देव बलवत्तर म्हणून ते सर्वजण थोडक्यात बचावले.
छाया बिलवणे, कविता मोहरकर, अनिल काटेखाये, रूपचंद बिलवणे, देवचंद बिलवणे, ज्ञानेश्वर बिलवणे, विजय मोहरकर, प्रमिला काटेखाये, दीपमाला बिलवणे, रुखुमा बिलवणे, संगीता नखाते, शालू भुरे, गीता बिलवणे, रज्जू मोहरकर, सुषमा बिलवणे, संगीता मोहरकर, सुनिता बिलवणे, ज्योत्स्ना मोहरकर, प्रियंका बिलवणे, राणी काटेखाये, विकी बिलवणे, श्रीकृष्ण काटेखाये यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी महसूल विभागाच्या अधिकारी- कर्मचा-यांनी जाऊन पंचनामा केला.
मोहाडी तालुक्यातील निलज खुर्द येथे शुक्रवारी (दि. 21) वीज कोसळून शेतात काम करणा-या पाच महिला जखमी झाल्या. त्यापैकी तीन महिलांवर करडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर दोन महिलांवर तुमसर उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.