Sambhaji Bhide Controversy | संभाजी भिडे भाजपचे सदस्य नाहीत : चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुनरुच्चार | पुढारी

Sambhaji Bhide Controversy | संभाजी भिडे भाजपचे सदस्य नाहीत : चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुनरुच्चार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे प्रकरणाची  (Sambhaji Bhide Controversy) दखल उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. संभाजी भिडे भाजपचे कार्यकर्ते नाहीत, वास्तविक सरकारने दखल घेतल्यावर आंदोलन करण्याची गरज नाही, नियमात असेल, त्यानुसार कारवाई होईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

बावनकुळे म्हणाले की, संभाजी भिडे (Sambhaji Bhide Controversy)   भाजपच्या कार्यकारणी समितीत नाहीत. किंवा आमचे कार्यकर्तेही नाहीत. त्यामुळे त्यांचा भाजपशी जो संबंध जोडला जात आहे, तो चुकीचा आहे. त्यांचे वेगळं व्यक्तिमत्व आहे. भाजपचा त्यांचा काहीही संबंध नाही. यावरून विरोधक राजकारण करत आहेत. सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे, यात सरकारच्या कारवाईसाठी वाट बघितली पाहिजे.

दरम्यान, यशोमती ठाकूर यांच्या बाबत छेडले असता त्यांना दुसरे कोणी दिसत नसल्याने काँग्रेस भाजपवर आरोप करत आहे. त्यांना धमकी येऊ नये, यासाठी सरकारने प्रयत्न करावे, हे ठीक आहे. पण प्रत्येक गोष्टीला भाजपशी जोडणे हे त्यांच्या मतदारसंघाच्या राजकारणाचा भाग आहे, अशी टीका केली.

प्रधानमंत्री आणि शरद पवार पुणे येथे कार्यक्रमात उद्या एका मंचावर येत आहे, बाळ गंगाधर टिळक यांच्या विचारांवर आधारित कार्यक्रम आहे. तो नॉन पॉलिटीकल कार्यक्रम आहे, जे असे वातावरण निर्माण करत आहे. ते योग्य नाही, असे बावनकुळे म्हणाले. महायुतीत जेव्हा आमचे उमेदवार उभे होतील, तेव्हा महायुतीचे सगळे नेते प्रचाराला येतील. भुजबळ उभे राहतील, तेव्हा आम्ही सगळे नेते त्यांच्या प्रचाराला जाणार आहोत. त्यांनी बोलण्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. विपर्यास कोणीच करू नये. महायुतीत एकमेकांच्या उमेदवारांचा प्रचार करतील. आमच्या मंचावर ते येतील त्यांच्या मंचावर आम्ही जाऊ. ही महायुती आहे, असा माझा बोलण्याचा अर्थ होता.

अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या काळात बांधकाम विभागामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाले आहेत. त्याच्या तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत. तक्रारी सरकारकडे पाठवल्या असून सरकार त्यावर चौकशी करेल, असेही बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा 

Back to top button