संभाजी भिडे यांच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंचा मोठा खुलासा | Sambhaji Bhide | पुढारी

संभाजी भिडे यांच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंचा मोठा खुलासा | Sambhaji Bhide

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अशात कालपर्यंत गप्प असलेल्या भाजपने आता या प्रकरणावर घुमजाव केले आहे. संभाजी भिडे आणि आमचा कुठलाही संबंध नसल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे. संभाजी भिडे हे स्वतंत्र असून ते आमच्या पक्षाचे कार्यकर्ते नाहीत. त्यामुळे त्यांनी काही आक्षेपार्ह वक्तव्य केले असल्यास सरकार ते तपासून त्यावर कारवाई करेल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
संभाजी भिडे हे भाजपचे पिल्लू असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यापूर्वी केला.  करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार त्यांचे खरे वडील होते, असे वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले आहे. दरम्यान, राज्यभरात संभाजी भिडे समर्थक-विरोधक रस्त्यावर उतरले आहेत. अधिवेशनात हा मुद्दा वादळी ठरला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे गट नेते बाळासाहेब थोरात यांनी संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे.
हेही वाचा

Back to top button