Sambhaji Bhide Controversy | भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करा, आव्हाडांचा पोलिस ठाण्यात ठिय्या | पुढारी

Sambhaji Bhide Controversy | भिडे यांच्यावर गुन्हा दाखल करा, आव्हाडांचा पोलिस ठाण्यात ठिय्या

ठाणे; पुढारी वृत्तसेवा :  महात्मा गांधी, ज्योतिबा फुले आणि साई बाबा यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान करणारे संभाजी भिडे हे सरकारचे दलाल असून, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा. तसेच त्यांना तत्काळ अटक करावी; या मागणीसाठी आज (दि.३१ जुलै) राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी कार्यकर्त्यांसह नौपाडा पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला आला. (Sambhaji Bhide Controversy)

मणिपूर प्रकरणी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलने होत आहेत. या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी मनोहर भिडे यांनी सरकारकडून सुपारी घेतली आहे. संभाजी भिडे यांच्याकडून महात्मा गांधी यांचे पिता मुसलमान होते, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल गलिच्छ बोलवून जातीय, सामाजिक तेढ निर्माण केला जात आहे, असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार तत्काळ भिडे यांना पोलिसांनी अटक करावी, अन्यथा विधानसभेचे कामकाज चालू देणार नाही असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. त्याकरिता काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांना आवाहन करणार आहे, असे देखील आव्हाड म्हणाले.

भिडे हे अकरावी नापास

मनोहर उर्फ संभाजी भिडे हे प्रोफेसर, ऑटॉमिक शिकवीत होते. असे काही नसून भिडे यांचे शिक्षण हे अकरावी नापास झाले असल्याची खळबळजनक माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. (Sambhaji Bhide Controversy)

Back to top button