

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : समृध्दी महामार्गावर औरंगाबादजवळ फुलंब्री हद्दीमध्ये मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून पुण्याकडे निघालेल्या खुराणा ट्रॅव्हल्स बसने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात १२ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी मध्यरात्री २:३० च्या सुमारास घडली.
महामार्ग पोलिस महाराष्ट्र सुरक्षा दल यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत बचाव कार्य सुरु केले. या मध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण या अपघातात नागपुरातील प्रवाशांसह १२ प्रवासी गंभीर जखंमी झाले आहेत. ट्रॅव्हल्समध्ये एकुण २० प्रवासी होते. इतर ८ प्रवासी किरकोळ जखमी झाले त्यांना सुटी दिली गेली, अशी प्राथमिक माहिती समृद्धी महामार्ग पोलिसांकडून मिळाली आहे.
१ जुलै रोजी समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स जळून २५ प्रवाशांचा मृत्यू झाला. आता पुन्हा या अपघाताने प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
यासोबतच नागपूरवरून पुण्याला जाणाऱ्या एका कारचा देखील अपघात झाला. यामध्ये ६ जण जखमी झाले, त्यांना जालना, औरंगाबाद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा :