यावेळी नागभीड जिल्हा झालाच पाहिजे, नागभीडकर जागा हो विकासाचा धागा हो, मित्रहो गावकरी ते राव न करी, करतो आम्ही नागभीड जिल्ह्याची तयारी अशा घोषणा देण्यात आल्या. शहरातील प्रमूख मार्गाने मोर्चा तहसील कार्यालय परिसरात पोहचल्यानंतर त्या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. याठिकाणी सर्वपक्षीय नेत्यांची भाषणे झाली. नागभीड शहर हे मध्यवर्ती ठिकाण आहे. रेल्वे जंक्शन व रेल्वे विभागाची साडेतीनशे एकर जागा उपलब्ध आहे. दळणवळणाच्या सोयीसुविधा, नैसर्गिक संपदा, घोडाझरी अभयारण्य, कोर्टाची सुसज्ज इमारत, १०० नवीन खाटाचे प्रस्तावीत रूग्णालय आहे. नागभीड हे ठिकाण ब्रम्हपूरी, सिंदेवाही, सावली, व चिमूर येथील जनतेला सोयीचे होईल असे मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे नागभीड जिल्हाची निर्मीती व्हावी, अशी आशा याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केली. नागभीडच्या तहसीलदारांना नागभीड जिल्हा निर्मितीसाठी निवेदन देऊन या मोर्चाची सांगता झाली.