W. Bengal Panchayat Repoll : प. बंगाल पंचायत निवडणुकीच्या पुनर्मतदानाच्या दिवशी या ठिकाणी सापडले 35 क्रूड बॉम्ब | पुढारी

W. Bengal Panchayat Repoll : प. बंगाल पंचायत निवडणुकीच्या पुनर्मतदानाच्या दिवशी या ठिकाणी सापडले 35 क्रूड बॉम्ब

W. Bengal Panchayat Repoll : पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकीच्या पुनर्मतदानाच्या दिवशी, मुर्शिदाबादमधील बेलडांगा परिसरात तलाव आणि शेतातून 35 क्रूड बॉम्ब सापडले. बॉम्ब निकामी करण्यासाठी स्थानिक पोलिसांसह बॉम्ब निकामी पथकही तातडीने घटनास्थळी पोहोचले.

पश्‍चिम बंगालमध्‍ये ८ जुलै रोजी पंचायत निवडणूक मतदानावेळी (Bengal panchayat polls) हिंसाचार झालेल्‍या मतदान केंद्रांवर आज ( दि. १०) पुन्‍हा मतदान घेण्‍यात येत आहे. राज्यातील १० जिल्ह्यांतील ६९७ बूथवर पुन्हा मतदान होण्यापूर्वी नव्‍याने हिंसाचाराच्‍या घटना घडल्‍या. कूचबिहारी जिल्‍ह्यात सत्ताधारी तृणमूलच्‍या कार्यकर्त्यांनी उमदेवारांच्‍या घरावर हल्‍ला केल्‍याचा आराेप काँग्रेस पक्षाने केला आहे.

W. Bengal Panchayat Repoll : कूचबिहारमध्‍ये काँग्रेस उमेदवाराच्‍या घरावर गोळीबार

पंचायत निवडणुकीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि हत्याकांडानंतर कूचबिहार जिल्ह्यातील सोमवार १० जुलै रोजी ५३ मतदान केंद्रावर पुनर्मतदानाचे आदेश देण्यात आले होते. रविवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी काँग्रेस उमेदवार नूरनाहर बीबी यांच्या घरावर हल्ला झाला. हल्‍लेखोरांनी देशी बॉम्ब फेकत गोळीबारही केल्‍याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

८ जुलै रोजी मतदानावेळी हिंसाचारा झालेलया पुरुलिया, बीरभूम, जलपाईगुडी, नादिया आणि दक्षिण २४ परगणा या पाच जिल्ह्यांतील ६९७ बूथवर सोमवार १० जुलै रोजी पुन्हा मतदान घेण्यात येईल, असे पश्चिम बंगाल राज्य निवडणूक आयोगाने (एसईसी) सांगितले होते.
३० पैकी २० जिल्ह्यांतील त्रिस्तरीय पंचायत निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार, मतपत्रिकांची लूट झाल्‍याचा आरोप विरोधी पक्षांनी केला होता. मुर्शिदाबाद, कूचबिहार, मालदा, दक्षिण 24 परगणा, उत्तर दिनाजपूर आणि नादिया यांसारख्या अनेक जिल्ह्यांतील बूथ कॅप्चरिंग, मतपेटींचे नुकसान आणि पीठासीन अधिकार्‍यांवर हल्‍ला करण्‍यात आल्‍याचा घटना घडल्‍या होत्‍या.

हे ही वाचा :

Bengal Panchayat Polls : प. बंगाल मतदान; बॉम्बस्फोट, दगडफेक, हिंसाचार; 15 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

‘रक्तरंजित’ राजकारण : पं. बंगालमध्‍ये मतदानावेळी हिंसाचार ९ ठार, जाणून घ्‍या ठळक घडामोडी

प. बंगालमध्‍ये ६९७ ठिकाणी पुनर्मतदान, कूचबिहारीमध्‍ये पुन्‍हा हिंसाचार

Back to top button