पुणेकरांनो, आता थेट पोलिस आयुक्तांनाच करा तक्रार | पुढारी

पुणेकरांनो, आता थेट पोलिस आयुक्तांनाच करा तक्रार

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पुणे पोलिसांकडून शहरात कोम्बिंग ऑपरेशन सुरू असून आता तक्रार करण्यासाठी व्हॉट्सॲप सेवा सुरू करण्यात आली आहे. आता पुणे शहरातील नागरिक थेट पोलिस आयुक्त यांच्याकडे तक्रार करू शकतात. पुणे शहर पोलिसांकडून तक्रार करण्यासाठी नवीन व्हॉट्सॲप क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. 8975953100 या नंबर वर कोणीही कधी ही तक्रार करू शकता.

पोलीस आयुक्त यांचा व्हॉट्स ॲप नंबर सेव्ह करून तुमच्या परिसरातील महिलांच्या सुरक्षेबाबत सूचना आणि अभिप्राय देण्यासाठी मेसेज करू शकता. त्यासोबतच इतर घटनांचा आढावा घेऊन कारवाई करण्यात येणार असून तातडीच्या सेवेसाठी ११२ डायल करा, असे आवाहन पुणे शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 

हेही वाचा:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर

इटलीच्या दिवंगत पंतप्रधानांनी गर्लफ्रेंडला दिले तब्‍बल ९०६ कोटी!, मृत्‍यूपत्र वाचाल तर थक्‍क व्‍हाल

पुणे: बकोरिया यांची बदली पीएमपीसाठी आघात, आम्ही आंदोलन करणार; आम आदमी पक्षाचा इशारा

 

Back to top button